पुणे - पुणे शहराची वाढत जाणारी लोकसंख्या, पाण्याचा वाढणारा वापर आणि गेल्या वर्षभरात पाणी गळती कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यामुळे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेने २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली होती..पण पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षीच्या पाणी कोट्यात फक्त ०.२१ टीएमसी इतकी वाढ करून २०२५-२६ वर्षासाठी १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याने सुमारे १०० कोटींचा दंड लागणार आहे..पुणे शहराला खडकवासला धरण प्रकल्प, भामा आसखेड आणि पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराचा विस्तार झाला असून, जुन्या हद्दीसह नवीन ३२ गावांना पाणीपुरवठा करावा लागतो. फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन्ही गावांना महापालिकेकडूनच पाणीपुरवठा केला जातो. शहरात शिक्षण, रोजगारासाठी येणाऱ्या तरंगत्या लोकसंख्येचे (फ्लोटिंग पॉप्युलेशन) प्रमाण मोठे आहे..जुन्या नव्या हद्दीतील लोकसंख्या, तरंगती लोकसंख्या अशी एकूण सुमारे ७६ लाख इतकी लोकसंख्या शहराची आहे. त्यासाठी महापालिकेने गळती गृहीत धरून प्रतिव्यक्ती प्रतिदिन १५० लिटर या प्रमाणे जुलै २०२५ ते जून २०२६ या वर्षासाठी २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. नियमाप्रमाणे पाण्याचे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाला सादर केले होते..पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवून या वर्षासाठी १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला असल्याचे कळविण्यात आले आहे. महापालिकेला हा पाणी कोटा मंजूर नसल्याने या विरोधात जलसंपदा विभागाच्या प्रथम वाद निवारण लवादाकडे तक्रार केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले..समाविष्ट गावांचा पाणी कोटा घटविलापुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना महापालिका प्रतिदिन १२० लिटर प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा करत आहे. त्यानुसार पाण्याची मागणी केली. पण पाटबंधारे विभागाने पुणे महापालिका या गावांमध्ये प्रतिदिन ७० लिटर प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा करत आहे, असे सांगत या गावांसाठी ०.४७ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. शहरातील काही संस्था, कंपन्यांना महापालिका पाणीपुरवठा करत असली तरीही तेथे पाटबंधारे विभागाकडून थेट पाणीपुरवठा केला जातो, असे सांगत तो कोटा देखील कमी केला आहे..दंडाची रक्कम वाढणारपाणी वापर १२५ टक्क्यांपर्यंत केल्यास दीड पट दंड आकारला जातो. त्यापेक्षा जास्त पाणी वापर झाल्यास तीन पट दंड आकारून पाणीपट्टी वसूल केली जाणार आहे. दरवर्षी महापालिका पाटबंधारे विभागाला सुमारे २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी भरत आहे. त्यापैकी १०० कोटी रुपये ही दंडाची रक्कम आहे. यंदा ही रक्कम वाढणार आहे..लोकसंख्या आकडेवारीवर वादमहापालिकेने शहराची लोकसंख्या ८४.६४ लाख दाखवत त्यासाठी २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केलीपाटबंधारे विभागाने या लोकसंख्येसाठी १५.०१ टीएमसी पाण्याची गरज आहे, २१.०३ टीएमसी पाण्याची गरज नसल्याचे सांगितलेपाटबंधारे विभागाने पुण्याची २०३१ ची लोकसंख्या ७६.१६ लाख इतकी गृहीत धरलीया लोकसंख्येच्या आधारावर पुणे शहरासाठी १४.६१ टीएमसी कोटा मंजूर केल्याचे पत्रात नमूद केले आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.