अरे वा !आता धरणात पडणाऱ्या अन्‌ सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन होणार अचूक

dam1.JPG
dam1.JPG
Updated on

पुणे : पावसाळ्यात पाणलोट क्षेत्राच्या शेवटच्या भागापासून ते धरणाच्या भिंतीपर्यंत पडणाऱ्या पावसाचे मोजमाप करणारी "रियल डेटा कलेक्‍शन सिस्टिम व फ्लड फोरकास्ट' आणि धरणांतून पाणी सोडण्याचे अचूक नियोजन व्हावे, यासाठी "रियल टाइम डिस्चार्ज सपोर्ट सिस्टिम' कुष्णा खोऱ्यातील सर्व धरणांवर बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही सिस्टिमच्या माध्यमातून पूरनियंत्रणाचे काम अचूक पद्धतीने करणे शक्‍य आता होणार आहे. 

गेल्या वर्षी आलेल्या पुराने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या पुरामध्ये काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला. आठवडाभर पुराचे पाणी ओसरू शकले नव्हते. अतिवृष्टी हे जसे एक कारण यामागे असल्याचे सांगितले जाते, तसे धरणातून पाणी सोडण्यासंदर्भातील योग्य नियोजन न झाल्यामुळे देखील त्याचा फटका बसल्याचे निदर्शनास आले होते. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणि सांगली व कोल्हापूर येथील पूरस्थितीतीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती देखील नियुक्त केली आहे.

या समितीने नुकताच आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यामध्ये देखील या दोन्ही सिस्टिम धरणांवर बसविण्यात आले असल्याचे नमूद केले आहे. 2014 मध्ये ही योजना हाती घेण्यात आली. त्यासाठी 150 कोटी रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच वर्षात कृष्णा खोऱ्यातील धरणावर हि सिस्टिम बसविण्याचे काम सुरू होते. गेल्या वर्षी या दोन्ही सिस्टिमची टेस्ट घेण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यातील डेटा कलेक्‍शन सिस्टिम पूर्णपणे कार्यन्वित करता आली नव्हती. मात्र, गेल्या वर्षभरात ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच त्यांचा वापर करण्यात येणार आहे. 

  • कृष्णा खोऱ्यात पायलट प्रोजक्‍ट 
  • राज्यातील अन्य खोऱ्यांमध्ये ही राबविण्यास सुरूवात 
  • देशातील हा पहिलाच प्रयोग 
  • धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाची अचूक नोंद होणार 
  • कोणत्या वेळेला किती पातळी वाढू शकते हे आधीच समजणार 
  • त्यानूसार पूराचे नियोजन करणे शक्‍य होणार 



पश्‍चिम महाराष्ट्र छोटे-मोठे मिळून सुमारे एक हजार धरणे आहेत. त्यापैकी शंभर धरणे ही मोठी आणि मध्यम स्वरूपाची आहेत. पावसाळ्यात या धरणातील पाणीसाठ्याचे नियंत्रण गेट ऑपरेशनच्या माध्यमातून केले जाते. या सर्व धरणांवर ही सिस्टिम बसविण्यात आली आहे. पावसाळ्यात या सिस्टिमच्या माध्यमातून या धरणातील पूर परिस्थिती नियंत्रित करणे शक्‍य होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


कृष्णा खोऱ्यातील धरणांवर हा पायलट पोजेक्‍ट राबविण्यात आला. आता तो राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सिस्टिममुळे पूराचे नियंत्रण करणे शक्‍य होणार आहे. देशात अशा प्रकारे राबविण्यात आलेला हा पहिला प्रयोग आहे. 
राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com