Video : खडकवासला धरण पूर्ण भरले, मुठा नदीतून पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू

 (व्हिडिओ : राजेंद्रकृष्ण कापसे)
Wednesday, 12 August 2020

- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- धरण साखळीतील चार धरणांमध्ये 18.63 टीएमसी पाणीसाठा

पुणे : खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, मुठा नदीतून पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

खडकवासला धरणाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता 1.98 अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये बुधवारी एकूण 18.63 टीएमसी पाणीसाठा झाला असून, हे प्रमाण 63.91 टक्के इतके आहे. 

खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस होत आहे. त्यात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 28 मिलिमीटर, वरसगाव 12, पानशेत धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी 14 मिलिमीटर तर, खडकवासला धरण क्षेत्रात सकाळपर्यंत तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

'पोलिसवाले को खतम कर दो' म्हणत चोरट्याने केला सुऱ्याने हल्ला

खडकवासला प्रकल्पात गतवर्षी 12 ऑगस्टअखेर 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. आजअखेर चार धरणांतील पाणीसाठा जवळपास 64 टक्क्यांवर गेला आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी :
टेमघर 1.67    (44.95)
वरसगाव 7.47    (58.28)
पानशेत 7.53    (70.75)
खडकवासला 1.98    (100)

कोयना धरणातील पाणीसाठा 71.69 टीएमसीवर (71.60 टक्के) पोचला आहे.‌ तर, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठा 15.35 टीएमसीपर्यंत (28.65 टक्के) पोचला आहे.

इतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा : 
भामा आसखेड 4.13     (53.85)
पवना 4.54   (53.39)
डिंभे 6.13    (49.07)
मुळशी 12.54     (67.95)
नीरा देवधर 6.88    (58.69)
भाटघर 16.60   (70.61)
वीर  9.14     (97.18)   
वारणावती 23    (82.57)
दूधगंगा 21.04    (87.75)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water released from Khadwasala dam

Tags
टॉपिकस
Topic Tags: