waterline burst
sakal
पुणे - पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि धोकादायक अशा कात्रज-कोंढवा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या रखडलेल्या नियोजनशून्य कामामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेतच. पण आता ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने काम केले जात असल्याने वारंवार जलवाहिनी फुटून नागरिकांना अघोषित पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.