पुण्यात पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा; पालिकेचा अजब कारभार, पेठांमध्येही टंचाई

water shortage in the pune city due to the mis-management of the municipal corporation
water shortage in the pune city due to the mis-management of the municipal corporation
Updated on

पुणे : कधी जलवाहिनी फुटल्यामुळे, तर काही विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अशा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. हीच परिस्थिती शहराच्या अन्य भागात देखील आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्याच्या अजब कारभारामुळे एकीकडे धरण भरली असून देखील दुसरीकडे नागरिकांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांना पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. निश्‍चित ठरलेल्या वेळेप्रमाणे होणारा पाणी पुरवठा गेल्या काही दिवसापासून विस्कळित झाला आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर प्रशासनाकडून प्रत्येक वेळी नवीन कारण पुढे केले जाते, अशी तक्रार तेथील नागरिकांकडून केली जात आहे. तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे, यांची माहिती आम्हाला देखील प्रशासनाकडून सांगितली जात नाही, असे कारण नगरसेवकांकडून पुढे केले जाते. त्यामुळे कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

व्हिजिट असलेल्या भागात पाणी 
पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि नगरसेवक यांची एकत्रित प्रभागात व्हिजिट असेल, तर त्या भागात पाण्याची तक्रार येणार नाही, याची विशेष काळजी कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. त्या प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत आहे, हे दाखविण्यासाठी अन्य भागातील व्हॉल्व कमी दाबाने सोडले जातात. असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या या खेळामुळे त्याचा त्रास अन्य भागातील नागरिकांना सोसावा लागतो. अशा प्रकारे प्रशासनाकडून नगरसेवक आणि नागरिकांना वेड्यात काढण्याचे काम करीत असल्याचे काही उदाहरणे समोर आली आहेत. 

निविदा अद्यापही गुलदस्त्यातच 
मध्यंतरी व्हॉल्व सोडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा काढतानाही यापूर्वीच्या मर्जीतील ठेकेदाराकडेच हे काम कसे राहील, यासाठी कशी काळजी पाणी पुरवठा विभागाकडून घेण्यात आली असल्याचे प्रकरण सकाळने उघडकीस आणले होते. त्यामुळे त्या निविदा अद्यापही उघडण्यात आल्या नाहीत. त्या निविदा न उघडण्यामागेचे कारण काय, स्पर्धा का होऊ द्यायची नाही, यासह अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडगावमध्ये अद्यापही पाणी कपात सुरूच 
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून सिंहगड आणि परिसराला पाणी पुरवठा होतो. आठवड्यातून एकदा या भागात पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. त्यावर नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर आणि सकाळने लक्ष दिल्यानंतर एक ऑक्‍टोबरपासून या भागात सुरळीत पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. हे आश्‍वासन केवळ आठवडाच टिकले. पुन्हा या भागात आठवड्यातून एकदा पाणी कपात सुरू झाली असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. 

गेल्या एक महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. पहाटे पाच ते आठ या वेळेच पाणी येते. तेही कमी दाबाने. काही वेळेस तर अर्धातास पाणी पुरवठा होतो. वारंवार तक्रार करूनही कोणतीही लक्ष देण्यास तयार नाही. 
- शेखर काटे ( रविवार पेठ) 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक ऑक्‍टोबरपासून सुरळीत पाणी पुरवठा होणार असे महापालिकेकडून सांगण्यात आले. पहिला आठवडाभर तसे झाले ही.आता पुन्हा आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. केंद्रात चौकशी केली, तर दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला असे कारण सांगितले जाते. दर आठवड्याला कसली दुरुस्ती हे करतात. 
- राजेंद्र कोकाटे (सिंहगड रोड) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com