जिल्ह्यात ११ तालुक्यांत पाणी टंचाई

जिल्ह्यात ११ तालुक्यांत पाणी टंचाई

पुणे, ता. २३ : जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात आजअखेरपर्यंत १३ पैकी ११ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या १७८ गावे आणि एक हजार ३१६ वाड्या-वस्त्यांना २५२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ही सर्व गावे मिळून चार लाख तीन हजार २०० लोकसंख्या आणि एक लाख ७० हजार ३६४ जनावरे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात मावळ व मुळशी हे अन्य दोन तालुके पहिल्यापासून टँकरमुक्त आहेत.
पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक ४० गावे आणि ३५३ वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईची झळ बसली आहे. या तालुक्यातील गावे आणि वाड्यांना ८७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यातील एक लाख सहा हजार ८८१ लोकसंख्येला आणि ७४ हजार ३३६ जनावरांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय टँकरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून ही बाब उघड झाली आहे.

पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ७८ खासगी विहीरी आणि १९ विंधन विहीरी (बोअरवेल) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पुरंदरपाठोपाठ आंबेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तालुक्यांतील २९ गावे आणि १५८ वाड्या-वस्त्यांना २३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

तालुकानिहाय टँकरची संख्या
- आंबेगाव --- २३
- बारामती --- २८
- भोर --- ०९
- दौंड --- १०
- हवेली --- २६
- इंदापूर --- १९
- जुन्नर --- २०
- खेड --- १४
- पुरंदर --- ८७
- शिरूर --- १२
- वेल्हे --- ०४

टँकरवर अवलंबून असलेली लोकसंख्या
- आंबेगाव --- ४० हजार १५२
- बारामती --- ४३ हजार ८९६
- भोर --- ११ हजार ८१९
- दौंड --- १६ हजार ३३८
- हवेली ---३२ हजार ३११
- इंदापूर --- ७३ हजार ४८०
- जुन्नर ---२३ हजार ४७३
- खेड --- २९ हजार ८८६
- पुरंदर --- १ लाख ६ हजार ८८१
- शिरूर --- २२ हजार ८२९
- वेल्हे --- १ हजार ९३७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com