खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 August 2020

जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्टच्या मध्यास बहुतांश सर्व धरणे काठोकाठ भरली होती. परंतु यंदा केवळ खडकवासला, कळमोडी, वीर आणि आंद्रा ही चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे‌त. पानशेत धरण एक- दोन दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत एकूण पाणीसाठा 25.33 टीएमसी (87 टक्के) झाला आहे. आज सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग नऊ हजार 416 क्युसेकने वाढविण्यात आला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यात गतवर्षी ऑगस्टच्या मध्यास बहुतांश सर्व धरणे काठोकाठ भरली होती. परंतु यंदा केवळ खडकवासला, कळमोडी, वीर आणि आंद्रा ही चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे‌त. पानशेत धरण एक- दोन दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता आहे.

Video : 'आधुनिक सावित्री' देतेय कोरोना रुग्णांना मूठमाती; आतापर्यंत केले ३० अंत्यसंस्कार​

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 25.33 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 29.15 टीएमसी (शंभर टक्के) पाणीसाठा होता. वरसगाव पानशेत आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. गेल्या 12 तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 80 मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत प्रत्येकी 105 मिलिमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पाण्याचा येवा वाढल्यामुळे खडकवासला धरणातून आज  सकाळी 11 वाजता विसर्ग पाच हजार 136 क्युसेकवरून नऊ हजार 416 क्युसेक करण्यात आला आहे. उजनी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर पोचला आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, (कंसात टक्केवारी) : 
टेमघर 2.46     (66.33)
वरसगाव 10.58     (82.50)
पानशेत 10.32     (96.91)
खडकवासला 1.97    (100)

...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​

इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 5.46   (71.27)
पवना 6.17   (72.54)
भाटघर 21.85   (92.94)
नीरा देवधर 9.63  (82.13)
वीर 8.67   (93)
डिंभे  8.96  (71.71)
कळमोडी 1.51  (100)
आंद्रा 2.92   (100)
उजनी 26.64  (49.73) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water storage at Khadakwasla project at 25 TMC