पुणे - पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत व स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व पेठा, कोंढवा, हडपसर, खराडी, औंध, बोपोडी, सहकारनगर आदी भागातील पाणी पुरवठा गुरुवार (ता. ९) बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुर होईल, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे केले आहे.