Water Supply : कात्रज परिसरात अपुरा पाणीपुरवठा

कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी रात्री-अपरात्री येत असून कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे भागातील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणांवर वाढल्या आहेत.
Water Supply
Water Supplyesakal

कात्रज - कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी रात्री-अपरात्री येत असून कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे भागातील नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणांवर वाढल्या आहेत. जोपर्यंत पाणी पुर्ववत होत नाही आणि संपूर्ण दाबाने येत नाही तोपर्यंत आठवड्यातील क्लोजरही बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Water Supply
Pune Breaking News : स्वत:ला IAS व PMO मध्ये पोस्टिंग सांगणाऱ्या तोतयाला पुण्यातून अटक

पाणी सोडताना प्रशासन दूजाभावही करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात पाणीपुरवठा होणाऱ्या राजीव गांधी पंपिंग स्टेशनद्वारे महादेवनगर टाकीला व केदारेश्वर टाकीला ६२ ते ६३ एमएलडी पाणी येते. दोन्ही टाक्याअंतर्गत समान पाणीपुरवठा होणारा भाग आहे. परंतु, त्यापैकी महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीला फक्त १२ ते १३ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, तसेच उर्वरित ५० एमएलडी पाणी हे केदारेश्वर पाण्याच्या टाकीला दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महादेवनगर टाकीमधून कात्रज-कोंढवा रस्ता, भारतनगर, दत्तनगर, जाधवनगर, गुजरवाडीफाटा, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुखसागरनगर भाग१, राजीव गांधीनगर, निंबाळकरवस्तीसह प्रभाग क्रमांक४० मधील कात्रज गावठाण, संतोषनगर व प्रभाग क्रमांक आणि ४१मधील शिवशंभूनगर, गोकुळनगर या भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे केदारेश्वर टाकीमधून प्रभाग क्रमांक ४१मधील कोंढवा गावठाण, येवलेवाडी, टिळेकरनगर व प्रभाग ४१च्या साईनगरसह इतर उर्वरित भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे लोकसंख्यानुसार आम्हाला किमान ३० एमएलडी म्हणजेच समसमान पाणी मिळावे अशी मागणी महादेवनगर टाकीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या परिसरातील नागरिकांनी करत आहेत.

Water Supply
Deccan Queen : पालिका अन् रेल्वे प्रशासनात भरडला जातोय पुणेकर

प्रतिक्रिया

प्रभाग क्रमांक ३८मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आम्ही याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडेही याची वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार केली आहे. या भागासाठी रोज २७ ते ३० एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ १२ एमएलडी पाणी मिळते, ते पुरत नाही. लोकसंख्यानुसार आम्हाला दिले पाहिजे ही आमची मागणी आहे.

- प्रतिक कदम, अध्यक्ष, प्रगती फाऊंडेशन

अशाप्रकारे पाणीपुरवठा होताना दुजाभाव होत असेल तर तो होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करू. या विषयावर कर्मचाऱ्यांशी तत्काळ चर्चा करूण्यात येईल. पाणीपुरवठा असमान होण्यामागे काय कारणे आहेत ते शोधून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

- काशिनाथ गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com