esakal | पुणे शहराच्या काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply in Pune closed tomorrow

महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या आवारातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. ५) या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पुणे शहराच्या काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या वारजे जलकेंद्राच्या आवारातील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. ५) या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोथरूड, बावधन, बालेवाडी, पाषाण, सूसमधील लोकांना एक दिवस पाणी नाही. शुक्रवारी (ता. ६) उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग : (चांदणी चौक टाकी) : उजवी, डावी भुसारी कॉलनी, परमहंसनगर, भूगाव, बावधन, पाषाण गावठाण, शास्त्रीनगर, सूस टाकी, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे, विधाते वस्ती, मुरकुटे वस्ती, म्हाळुंगे गाव, सूस गाव, सूस रस्ता, मोहनगर आणि परिसर. 

loading image
go to top