Video : खडकीतील पाण्याची टाकी पाडण्यास सुरवात

Video : खडकीतील पाण्याची टाकी पाडण्यास सुरवात

खडकी बाजार : शेवाळे टॉवरजवळ खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने 1983 साली बांधलेली पाण्याची टाकी धोकादायक बनल्यामुळे ती टाकी तोडण्यास सुरवात केली असून, शुक्रवार (ता.10) सकाळी अकरा वाजल्यापासून टाकी पूर्णपणे पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.  

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरी वस्तीमध्ये नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी बोर्डाने 1983 मध्ये 16 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली होती. काही वर्षानंतर टाकीतून पाणी झिरपू लागले व सिमेंटचे पोपडे पडू लागल्याने टाकी धोकादायक बनली होती. त्यामुळे 1996 साली या टाकीत पाणी भरणे बंद झाले. त्याऐवजी खडकीतील नेहरू उद्यान (त्रिकोणी गार्डन) येथे सुमारे 25 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बनवण्यात आली. त्या टाकीतून खडकीला पाणीपुरवठा होत आहे.

1996 पासून टाकी बंद अवस्थेत होती. बोर्डाने टाकी पाडण्यासाठी अनेक वेळा टेंडर प्रक्रिया राबवल्या. मात्र, टाकी पाडण्यासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च येत असल्यामुळे टाकी पडण्याचे काम प्रलंबित पडले होते. अखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून टाकी पडण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com