Pune News : पुणे विभागात भर पावसाळ्यात यंदा टँकरचे द्विशतक पूर्ण

साताऱ्यात सर्वाधिक ९७ टँकर ः १७५ गावे, १११४ वाड्यांना टँकरद्वारे पाणी
water tanker supply in Pune division this year during rainy season 97 tankers in Satara water through tankers
water tanker supply in Pune division this year during rainy season 97 tankers in Satara water through tankersesakal
Updated on

पुणे : पुणे विभागात यंदा भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकर्सने द्विशतक पूर्ण केले आहे. सध्या विभागातील १७५ गावे आणि १ हजार ११४ वाड्या-वस्त्यांना २०० टॅँकर्सद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक ९७ टँकर हे सातारा जिल्ह्यात सुरु आहेत. आजघडीला विभागातील साडेतीन लाखांहून अधिक लोकसंख्या आणि सव्वा लाखाहून अधिक पशूधन (जनावरे) ही टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

चालू वर्षीच्या पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने, विभागातील पाणी टंचाई ही उन्हाळ्यापेक्षा भर पावसाळ्यात अधिक तीव्र झाली आहे. यामुळे भर पावसाळ्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागणाऱ्या गावांची, वाड्या-वस्त्यांची संख्या वाढू लागली आहे.

ही संख्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी उलट त्यात अधिकची भरच पडू लागली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने दररोज विभागातील सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

water tanker supply in Pune division this year during rainy season 97 tankers in Satara water through tankers
Nashik Water Crisis: पेरणी नसलेल्या 40 दृष्काळी गावांसाठी शासनाला प्रस्ताव

यंदाच्या भर उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यात पुणे विभागात केवळ ३९ टँकर सुरु होते. या टँकरद्वारे विभागातील ४५ गावे १८९ वाड्या-वस्त्यांमधील ६५१ लोकसंख्येला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र पावसाळा सुरु होताच, ही संख्या पूर्णपणे कमी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. ती अटकळ आता फोल ठरली आहे.

दरवर्षी साधारणतः डिसेंबर महिन्यापासूनच विभागातील काही गावे आणि वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावांच्या संख्येवरून दिसून येत असे. परंतु यंदाच्या पावसाळ्यातसुद्धा दिवसेंदिवस टॅँकरची मागणी वाढू लागल्याचे दिसून आले आहे.

water tanker supply in Pune division this year during rainy season 97 tankers in Satara water through tankers
Pune Water Supply : पाणी सोडण्यासाठी स्वयंचलित व्हॉल्व्ह; पुणे शहरात सुमारे ३०० व्हॉल्व्ह बसविण्यात येणार

सद्यःस्थितीत पुणे विभागातील एकूण ३ लाख ५३ हजार ६६६ लोकसंख्येला आणि १ लाख २७ हजार ३५३ पशुधनाला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी एकूण २०० टँकर्स सुरु करण्यात आले आहेत. एकूण टँकरमध्ये सरकारी टँकर्सची संख्या केवळ २६ असून, उर्वरित १७४ टँकर्स हे खासगी आहेत.

कोल्हापूर टँकरमुक्त

दरम्यान, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा हा यंदा पहिल्यापासून (उन्हाळ्यापासून) आजअखेरपर्यंत कायम टँकरमुक्त राहिला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात आणि भर पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ देऊनही अद्याप एकही टँकर सुरु करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय या जिल्ह्यातील टँकरची मागणी करणारा अद्याप एकही प्रस्ताव आलेला नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

जिल्हानिहाय टँकर व तहानलेली लोकसंख्या

- पुणे --- ५१ टॅंकर्स --- १ लाख ११ हजार २८३ लोकसंख्या

- सातारा --- ९७ --- १ लाख ३७ हजार ८०८

- सांगली --- ३७ --- ७८ हजार ५२१

- सोलापूर --- १५ --- २६ हजार ५४

- कोल्हापूर --- निरंक --- निरंक

- एकूण --- २०० --- ३ लाख ५३ हजार ६६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com