डेक्कन येथील भिडे पुलापर्यंत पाणी; वाहतुक अन्य मार्गाने वळविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन येथील भिडे पुलापर्यंत पाणी; वाहतुक अन्य मार्गाने वळविली

डेक्कन येथील भिडे पुलापर्यंत पाणी; वाहतुक अन्य मार्गाने वळविली

पुणे : खडकवासला धरणातुन गुरुवारी रात्री पाण्याचा मुठा नदीत विसर्ग वाढल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री डेक्कन येथील भिडे पुलपर्यंत पाणी आले. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून दरम्यान, नदीपात्रातून होणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली तसेच पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला.

खडकवासला धरणातील विसर्ग रात्रीचा 25 हजार क्यूसेक होता. पाऊस कमी झाल्यामुळे तो मध्यरात्रीनंतर विसर्ग कमी झाली आहे. सकाळी आठ फक्त 2 हजार 553 क्यूसेक केला होता. सकाळी दहा वाजल्या नंतर पाऊस पुन्हा वाढल्याने दुपारी एक वाजता तीन हजार 412 क्यूसेक केला जाणार आहे.

हेही वाचा: पुणे- मुंबई मार्गावरील ११ रेल्वेगाड्या रद्द

खडकवासला धरण साखळीमध्ये तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव धरणातील पाणी साठयात वाढ झाली, तर खडकवासला धरण 100 टक्के भरले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून धरणातुन प्रारंभी पाच हजार क्यूसेक इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी हे प्रमाण वाढविण्यात आले. परिणामी सुरूवातीला शिवणे येथील नांदेड पुल पाण्याखाली गेला. त्यानंतर रात्री 11 वाजल्यानंतर पाणी डेक्कन जवळच्या भिडे पुलापर्यंत आली.

भिडे पुलापर्यंत पाणी आल्याने कर्वेनगर, वारजे, कोथरुड, डेक्कन येथून शहराच्या मध्यवर्ती भागात नदीपातरातून येणारी वाहने महेंदळे गैरेजजवळील चौक व रजपूत झोपडपट्टी येथून वळविण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली. तसेच मध्यवर्ती भागातुन नदीपात्रातुन डेक्कन परिसरात जाणारी वाहतुकही वळविण्यात आली.

टॅग्स :pune