esakal | पुणे- मुंबई मार्गावरील ११ रेल्वेगाड्या रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Passengers traveling to Mumbai, Pune, Nagpur, Kolhapur hit, 18 trains canceled

पुणे- मुंबई मार्गावरील ११ रेल्वेगाड्या रद्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुसळधार पावसामुळे लोणावळा (lonavla) - कर्जत (karjat)दरम्यान दरड मध्यरात्री पासून दरड कोसळल्यामुळे पुणे (pune)- मुंबई (mumbai) मार्गावर धावणाऱ्या ११ रेल्वेगाड्या (train) रद्द करण्यात आल्या. गुरुवारी पुणे- मुंबई मार्गावर एकही रेल्वे धावली नाही. लोहमार्गावर पडलेली दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शुक्रवारी काही अंशी वाहतूक सुरळीत होण्याची आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली. (11 trains on Pune-Mumbai route canceled)

पुणे- मुंबई मार्गावर घाट विभागात सध्या पावसाचा जोर आहे. त्यामुळे तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली आहे. लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी पुण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून पुण्याकडे गुरुवारी एकही रेल्वेगाडी धावली नाही. पुणे- मुंबई मार्गावरील डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, इंद्रायण एक्स्प्रेस तसेच मुंबई - कोल्हापूर मार्गावरील महालक्ष्मी एक्सस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस आणि पुणे- अहमदाबाद या गाड्या गुरुवारी रद्द झाल्या.

हेही वाचा: पाणी पुरवठा निविदेतील ‘जादू’ची महापालिका वर्तुळात चर्चा

पुण्यावरून जाणाऱ्या मुंबई- गदग, मुंबई - हैदराबाद, मुंबई- लातूर, मुंबई - सोलापूर, पनवेल - नांदेड या गाड्या रद्द झाल्या. मुंबई - भुवनेश्वर ही गाडी पुण्यावरून सोडण्यात आली. तसेच पनवेल- नांदेड, दादर - म्हैसूर या गाड्याही पुण्यावरून सोडण्यात आल्या, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

हेही वाचा: माजी आमदाराच्या निवाऱ्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

पडलेल्या दरड काढण्यासाठी रेल्वेच्या मुंबई विभागाची तीन पथके कार्यान्वित आहेत. लोहमार्गावरून दरड निघाल्यावर टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईवरून येणारी वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुण्यावरून जाणारी वाहतूक सुरू होऊ शकते, असा रेल्वे प्रशासनाचा अंदाज आहे.

loading image