"Water Woes in Viman Nagar: Residents Protest Irregular Supply"
Sakal
पुणे
Pune Water Crisis : अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या विरोधात उद्रेक; विमाननगरमधील रस्त्यावर नागरिकांकडून ठिय्या आंदोलन
Water Supply Issue : विमाननगरमधील अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आणि आंदोलन केले.
वडगाव शेरी : विमाननगरच्या यमुनानगर येथील अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या विरोधात मंगळवारी (ता.२३) नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी परिसराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्याची टाकी गाठून तेथील मुख्य रस्त्यावर ठिय्या मारला आणि कपडे धुण्याचे आंदोलन केले.

