Pune Theft: पुण्यात घरफोड्यांची साखळी; लोकमान्यनगर, आंबेगाव, विश्रांतवाडी आदी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, १६ लाखांचा ऐवज लंपास
Pune News: पुण्यात लोकमान्यनगर, आंबेगाव, विश्रांतवाडी, सहकारनगर व हांडेवाडीत घरफोडी व दुकानफोडीच्या घटना घडल्या. सुमारे १६ लाखांचा ऐवज चोरीला गेला असून पोलिस तपास सुरू आहे.
पुणे : शहरातील लोकमान्यनगर, आंबेगाव, सहकारनगर, विश्रांतवाडी आणि हांडेवाडी परिसरात घरफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. या वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी सदनिका आणि दुकानाचे कुलूप तोडून सुमारे १६ लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.