काँग्रेस-राष्ट्रवादीकडे 55-60 जागांची मागणी : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे.

पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष आणि संघटनांनी प्रजा लोकशाही परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (ता.20) प्रजा लोकशाही परिषद सत्ता परिवर्तन मेळावा घेण्यात आला.

पुणे : स्वयंपाक करताना गॅसगळतीमुळे आग; महिलेसह मुलगा भाजला

शेट्टी म्हणाले, काँग्रेस- राष्ट्रवादीने सध्या 34 जागा देण्याबाबत बोलणी सुरू आहे. आणखी 15 ते 20 जागा वाढवून मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. मात्र, जागा वाटपाबाबत आपली लवचिक भूमिका आहे. जागांबाबत कोणताही वाद घातला जाणार नाही.

Vidhan Sabha 2019 : शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन

आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. परंतु अद्याप माझी मानसिकता झालेली नाही. जर चंद्रकांत पाटील हे ग्रामीण भागातून विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात उभा राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील हजारो तरुणांचा रोजगार गेला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून भूमिका मांडली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यात तरुणांच्या प्रश्नांवर बोलतील, असे अपेक्षित होते. परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे भाषण करून जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे तरुणांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are Demand 55 to 60 seats to Congress NCP says Raju Shetti Maharashtra Vidhan Sabha Election