#WeCareForPune अशी घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

सर्दी, खोकला, श्‍वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्यूमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात. 

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे मुख्यत्वे श्‍वसन संस्थेशी निगडित असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्‍वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्यूमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

काय काळजी घ्यावी...
    श्‍वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
    हात वारंवार धुणे.
    शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्‍यू पेपर धरणे.
    अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.
    फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.

आजार पसरतो कसा?
    शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून हा आजार पसरतो.
    शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. 
    हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक चोळण्याच्या सवयीमुळेही हा आजार पसरू शकतो.
    कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही.
    रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात.

डॉक्‍टरांचा सल्ला तत्काळ घ्या 
    ताप, खोकला व श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या व्यक्ती.
    कोणत्या आजाराने त्रास होतो हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने कोरोना बाधित देशात प्रवास केला असल्यास. 
    प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका
सोशल मीडियावर कोरोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. तसेच आवश्‍यक असल्यास नागरिकांनी हेल्प लाइनला फोन करून शंका निरसन करून घ्यावे. चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी आदेश देण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We Care For Pune Punekar take care