आम्हाला मिळाला हवा तसा ताजा भाजीपाला 

Vegetable
Vegetable

"ऍग्रोवन'च्या "सेव्हन मंत्रा' उपक्रमाचे ग्राहकांकडून स्वागत; पुणे, पिंपरीत उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे - 'कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज मला एकदम ताजी भाजी आणि दर्जेदार फळे घरपोच मिळाली. त्याचे पॅकिंग अत्यंत चांगले आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केले होते. आम्हाला हवा तसा ताजा भाजीपाला मिळाला, याचा मनापासून आनंद आहे,'' अशा शब्दांत मंगळवारी "ऍग्रोवन'च्या पुढाकारातून सुरू झालेल्या "सेव्हन मंत्रा'च्या भाजीपाला आणि फळे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्राहकांच्या दारात पोचविण्याच्या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारपासून शेतकऱ्यांचा ताजा माल बांधावरून थेट ग्राहकांच्या घरात पोचविण्यात आला. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. आज सकाळी सात वाजल्यापासून "सेव्हन मंत्रा'च्या भाजीपाला आणि फळांच्या बास्केट ग्राहकांच्या घरी अत्यंत सुरक्षितरीत्या पोचविण्यात आल्या. "सेव्हन मंत्रा' या ब्रॅण्डने दोन्ही शहरांमध्ये वितरणाची चोख व्यवस्था केली होती. मास्क, हॅण्डग्लोज घातलेल्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडूनच शास्त्रशुद्ध पद्धतीने पॅकिंग करून आणलेला सर्व माल घरोघरी पोचविला. आज वितरित केलेल्या मालाची आगाऊ नोंदणी करण्यात आली होती; तसेच मोठ्या संख्येने पुढच्या दिवसासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी बुकिंग केले.

चांगल्या दर्जाबद्दल ग्राहक आनंदी
गेल्या 15 वर्षांपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या दैनिक "ऍग्रोवन'चा हा उपक्रम असल्याने "ऍग्रोवन'च्या विश्‍वासार्हतेमधून आणि कसोटीतून भाजीपाला आणि फळांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या मालाचा दर्जा अत्यंत चांगला असल्याच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष बास्केट खरेदी केलेल्या ग्राहकांनी व्यक्त केल्या. 

अशी आहेत वैशिष्ट्ये...
- भाजीपाला, फळे तोडणीपासून 24 तासांच्या आत घरात.
- भाजीपाल्यासाठी चार पर्याय उपलब्ध. 
- ग्राहकांना निवडता येणार सोयीनुसार माल.
- दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी होणार वितरण. 
- दोन दिवस अगोदर करावे लागणार बुकिंग.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया...
भाज्या ताज्या, स्वच्छ होत्या. पॅकिंग खूप आवडले. कांदे, बटाटे आणि लसणाचे बास्केट आवडले. कोथिंबिरीचे देठ कापून चिखल दूर केला हे खूप छान होते. डिलिव्हरीसाठी आलेले प्रतिनिधी मास्क, हॅण्डग्लोज घालून सॅनिटाइज होऊन आले होते. 
- नेहा हळबे 

खूप दिवसांनी ताजा भाजीपाला मिळाला. अत्यंत स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा भाजीपाला आहे. बास्केटमधील भाज्यांची निवड चांगली आहे. भाज्या निवडण्याचा अधिकार ग्राहकाला दिला आहे.
- नफिसा पारकर (हडपसर) 

कोथिंबीर, पालक, आले अशा सर्वच गोष्टी ताज्या आणि उत्तम दर्जाच्या होत्या. कोरोनाच्या काळात सुरक्षित घरपोच दर्जेदार भाजी दिली, त्याबद्दल "ऍग्रोवन'चे विशेष आभार. 
- नेहा सौंदेकर (शरदनगर, चिखली) 

भाजीचे सर्व प्रकार सुस्थितीत होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालनही चांगले केलेले होते. पहिल्याच दिवशी चांगली सेवा मिळाल्याने नातेवाइकांनाही ही सेवा घेण्याबाबत सुचविणार आहे.
- अश्‍विनी कुलकर्णी (चिंचवड) 

डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीच्या हाताला दर्जेदार हातमोजे होते. त्यामुळे सुरक्षित वाटले. कोरोनामुळे भाजीखरेदीसाठी बाहेर जाणे धोक्‍याचे आहे. बाजारात मिळणाऱ्या भाजीपेक्षा या पेटीतील भाजी अधिक स्वच्छ आणि ताजी होती. 
- कांचन मांढरे (प्राधिकरण) 

या सेवेमुळे गर्दीत भाजी खरेदीसाठी जावे लागणार नाही. घरपोच भाजी मिळणे, ही नागरिकांची गरज बनली आहे. संगणकाच्या युगात सर्व काही ऑनलाइन होत आहे. 
- अतुल सोंडेकर (चिखली) 

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत भाजी मिळते. यामध्ये कमीत कमी हाताळणी होते, ही चांगली बाब आहे. चांगला दर्जा असल्याने सोसायटीच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर भाजीचे छायाचित्र शेअर केले आहे.
- सुनील सावंत (नेहरूनगर) 

ज्येष्ठांकडून मिळाली दाद 
पुणे आणि पिंपरी शहराच्या विविध भागांत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनीही आवर्जून भाजीपाला आणि फळांचे बास्केट मागवून घेतले. कोथरूडमधील अलंकार पोलिस चौकीजवळ राहणाऱ्या शुभांगी फडके यांनी दूरध्वनी करून भाजीपाला मागवून घेतला. ज्येष्ठांसाठी बाहेर जाऊन भाजी खरेदी करणे अवघड आहे. अशावेळी तुम्ही हा उपक्रम सुरू करून आमची खास सोय केली, अशा भावना फडके यांनी व्यक्त केल्या. 

पहिली पेटी मंगलमूर्ती चरणी 
"सकाळ ऍग्रोवन'च्या "सेव्हन मंत्राज' या उपक्रमाच्या माध्यमातून नोकरदार महिलांची नेमकी गरज हेरून घरपोच भाजीपाला आणि फळे विक्रीच्या उपक्रमाचा मंगळवारपासून शुभारंभ करण्यात आला. याअंतर्गत भाजीची पहिली पेटी चिंचवड येथील मंगलमूर्ती चरणी अर्पण करण्यात आली. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज यांनी ही पेटी स्वीकारली. सरकारच्या नियमानुसार मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंगलमूर्ती वाड्याबाहेर मंदार देव महाराज यांनी ही भाजीची पेटी स्वीकारली. भाजी देताच त्यांनी देवस्थान ट्रस्टच्या आचाऱ्यांना बोलावून आज हीच भाजी शिजवून त्याचा नैवेद्य "श्रीं' ना दाखवावा, अशी सूचनाही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com