zp school
sakal
पुणे - जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी आणि त्यांच्यात संवाद कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्यासाठी ‘आम्ही इंग्रजी शिकतो’ (वी लर्न इंग्लिश) हा कार्यक्रम २५ वर्षांनंतर नव्या स्वरूपात पुन्हा सुरू होत आहे. पुणे जिल्हा परिषद आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस (सीएलआर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ-२०२३) यानुसार कार्यक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे.