आम्ही करू शरद पवारांचे संरक्षण - महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम

संपत मोरे
Friday, 24 January 2020

पुणे-"शरद पवार आम्हा पैलवानाचे आधारस्तंभ आहेत. भारत सरकारने त्यांचे संरक्षण काढून घेतले ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांचे संरक्षण जरी केंद्र सरकारने काढून घेतले तरी आम्ही दिल्लीत जाऊन त्यांच्या बंगल्याबाहेर थांबू त्यांना संरक्षण देऊ."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी सकाळला दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे संरक्षण काढून घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम म्हणाले," महाराष्ट्रात कुस्ती मल्लविद्या वाढावी म्हणून पैलवानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या शरद पवार यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील.
 
कदम पुढे म्हणाले, 'त्यांना सरकारी संरक्षणाची गरज नाही. शरद पवार यांना आम्ही साक्षात बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. आज त्यांना संरक्षण काढून त्यांचा जो अपमान केला आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तमाम पैलवान सरसावले आहेत.आम्ही दिल्लीत जाऊन त्यांना संरक्षण देऊ."अस कदम यांनी म्हटलं आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will protect Sharad Pawar says Maharashtra Kesari Appapaheb Kadam