माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, कारण...

डॉ. संदेश शहा
Thursday, 8 October 2020

महिला सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल तसेच महिला व युवती यांच्यावर होणारे अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांना दिले.

इंदापूर : महिला सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल तसेच महिला व युवती यांच्यावर होणारे अत्याचार, हल्ले रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांना दिले. यावेळी युथ कनेक्टच्या स्नेहल शिवाजी बांगर उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या, ''स्त्रियांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे नोंद न होणाऱ्या घटनांचीही संख्या जास्त आहे. आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील पुढे म्हणाल्या, ''स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे परंतू त्याबरोबरच आवश्यक जनजागृती करणे गरजेचे आहे.'' यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक अंकिता पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भेट दिले.

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will stop atrocities in pune district says dr rajesh deshmukh