

Pune Continues to Sizzle; Minor Relief Likely in Coming Days
sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानामध्ये चढ-उतार नोंदविण्यात येत होते. त्यामुळे शहरात कधी ढगाळ वातावरण, तर कधी कडक ऊन असे चित्र होते. रविवारी (ता. २२) किमान आणि कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झाली. परिणामी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानामध्ये किंचित घट होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.