pune weather
sakal
पुणे - सकाळी ऑफिसला जाताना स्वेटर घालावा की नाही आणि दुपारी एसी लावावा की फॅन, अशा द्विधा मनःस्थितीत सध्या पुणेकर अडकले आहेत. डिसेंबरमध्ये ज्या गुलाबी थंडीने पुणेकरांना हुडहुडी भरवली, तीच थंडी जानेवारी संपूर्ण महिना आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला अचानक गायब झाल्याने ‘विंटर फॅशन’ कपाटात परतली आहे, तर पुढील पाच ते सात दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.