पावसाचा जोर ओसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update maharashtra rain forcast intensity of rain has receded

पावसाचा जोर ओसरला

पुणे : दोन आठवड्यांपासून जोरदार बॅटींग करणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. पुण्यासह राज्यभरात पावसाने अनेक ठिकाणी उघडीप दिली असून, ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. निवडक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरींनी हजेरी लावली होती. रविवारी शहरात फक्त ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्राने कोकण किनारपट्टीवरील बाष्प खेचून घेतले आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला असून, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. १८) हवामान सामान्यतः ढगाळ तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Web Title: Weather Update Maharashtra Rain Forcast Intensity Of Rain Has Receded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..