पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपाशेजारील रस्ता पाण्याखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update rain Dharmavat petrol pump road under water Pisoli administration action pune

पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपाशेजारील रस्ता पाण्याखाली

उंड्री : पहिल्याच पावसात बायपास रस्त्यावरील धर्मावत पेट्रोल पंपासमोर तळे आणि पंपाशेजारून धावडेनगरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांची पायवाट बंद झाली होती. पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिकांनी केली आहे.कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गावर पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपासमोर उतार असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे वाहनचालकांना चेंबर आणि रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. पेट्रोल पंपाशेजारून नव्याने निर्माण झालेली गृहसंकुले, कामगारवस्ती आणि पुढे हरिसुंदरनगरकडे हा रस्ता जातो. पेट्रोल पंपापुढे स्मशानभूमी असून, ओढ्याशेजारून हा रस्ता जात असून, पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी साचून राहते, असे येथील नागरिकांनी सांगितले.

पिसोळी ग्रामपंचायतीने धावडेनगरकडे जाणारा महात्मा फुले रस्ता केला आहे. या परिसरात नागरी वस्ती वाढली आहे. पालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-स्नेहल दगडे, माजी सरपंच, पिसोळी

रस्त्यात पाणी साचल्यामुळे आणि रात्रीच्या वेळी गतिरोधक, खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी कोलमडून अपघात होतात. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांचाही गोंधळ उडतो.

- चंद्रकांत काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पिसोळी

रस्त्याची उंची कमी असून, पावसाळी वाहिनी नाही. त्यामुळे पाणी साचले आहे. या रस्त्यासाठी लवकरच टेंडर काढून रस्त्याची उंची वाढवून, पावसाळी वाहिनी टाकून येथील समस्या कायमची सोडविली जाईल.

-नरेश शिंगटे, कनिष्ठ अभियंता, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Web Title: Weather Update Rain Dharmavat Petrol Pump Road Under Water Pisoli Administration Action Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top