

Joy Turns into Grief: Two-Year-Old Girl Dies in Alandi Accident During Family Wedding
esakal
आळंदी: रस्ता ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन वर्षांच्या मुलीला चारचाकी कारने धडक दिली आणि कारखाली येऊन ती जागीच ठार झाली. श्रुतिका संतोष मिरासे (वय 2, रा. पुसद, यवतमाळ) असे अपघातात मरण पावलेल्या बालिकेचे नाव आहे. तर अपघातस्थळावरून बेदरकारपणे गाडी चालवत पळून जाणाऱ्या डॉ. प्रथमेश भीमराव कोकणे (वय 26, रा. चिंबळी, ता. खेड, मूळ पत्ता: रुई पाटी, बारामती) याला नागरिकांच्या साहाय्याने पोलिसांनी चिंबळी फाटा येथे ताब्यात घेतले.