
पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी - अजित पवार
पुणे : पुण्यात सातत्यानं वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेता वीकेंड लॉकडाऊनबाबत (Weekend Lockdown) पुढील शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. पुण्यातील परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Weekend lockdown in Pune to be decided next Friday Info by Ajit Pawar)
हेही वाचा: "जर तुम्ही ऐकलं नाहीत तर..."; अजित पवारांचा पालकांना इशारा
पवार म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमावलीबाबत जो निर्णय घेतला आहे. तोच निर्णय सध्या लागू आहे. हेच आदेश मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लागू करण्याचे आदेश दिलेत तसेच त्यांनी याबाबत महापालिकेला कळवलं आहे. त्याचं तंतोतंत पालन करणं हे आमचं धोरण आहे. या अनुषंगानं विविध प्रकारची चर्चा झाली. पण या आठवड्यात तरी कुठलाही बदल करु नये असं ठरलं आहे. यानंतर पुढच्या आठवड्यात काय परिस्थिती राहते, हे पाहून आपण येत्या शुक्रवारी जी बैठक होईल त्यामध्ये निर्णय घेऊ"
पालकांना दिला इशारा..
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पण तरीही पालक आपल्या लहान मुलांना सध्या हॉटेल्स किंवा मॉलमध्ये गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं याबाबत काही नियमावली जाहीर होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. पवार म्हणाले, "मुख्यमत्र्यांनी कोरोनाची जी नियमावली ठऱवली आहे, तिचं नियमावली सध्या लागू आहे. या नियमावलीनुसार आपण सध्या शाळा बंद ठेवलेल्या आहेत. मुलांना त्रास होऊ नये यासाठी आपण या गोष्टी केल्या आहेत पण जर त्यांच्या पालकांना ऐकायचंच नसेल तर या आठवड्यातील सात दिवसांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही काय निर्मण घ्यायचा तो घेऊ"
Web Title: Weekend Lockdown In Pune To Be Decided Next Friday Info By Ajit Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..