"जर तुम्ही ऐकलं नाहीत तर..."; अजित पवारांचा पालकांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar
"जर तुम्ही ऐकलं नाहीत तर...";अजित पवारांचा पालकांना इशारा

"जर तुम्ही ऐकलं नाहीत तर..."; अजित पवारांचा पालकांना इशारा

पुणे : शहरात (Pune City) कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लहान मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालकांना गंभीर इशारा दिला आहे. निर्बंधांबाबत जर तुम्ही सरकारचं ऐकलं नाही तर याबाबत कठोर निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी म्हटलं आहे. शहराच्या स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Corona virus Ajit Pawar warns parents If you havent heard of govt)

हेही वाचा: हॉटेल उद्योगाची दुर्दशा थांबवा, ‘आहार’ची राज्य सरकारकडे धाव

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पण तरीही पालक आपल्या लहान मुलांना सध्या हॉटेल्स किंवा मॉलमध्ये गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं याबाबत काही नियमावली जाहीर होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. पवार म्हणाले, "मुख्यमत्र्यांनी कोरोनाची जी नियमावली ठऱवली आहे, तिचं सध्या लागू आहे. या नियमावलीनुसार आपण सध्या शाळा बंद ठेवल्या आहेत. मुलांना त्रास होऊ नये यासाठी आपण या गोष्टी केल्या आहेत पण जर त्यांच्या पालकांना ऐकायचंच नसेल तर या आठवड्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही काय निर्मण घ्यायचा तो घेऊ"

कोरोनाच्या सेल्फ टेस्टिंगसाठी आधार गरजेचं?

कोरोना चाचणीसाठीच्या सेल्फ टेस्टिंग कीटसाठी नागरिकांना मेडिकलमध्ये आधार कार्ड दाखवण्याची सक्ती करण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण यावेळी अजित पवार यांनी दिलं. उलट नागरिकांनी हे किट घ्यावेत आणि तपासणीनंतर जर घरात कोणी कोविड पॉझिटिव्ह आढळला तर त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. तसेच सौम्य लक्षणं असल्यास त्यांनी घरीच उपचार घ्यावेत, असंही पवार यांनी सांगितलं. तसेच मेडिकलची दुकानदारांनी कोरोनाचं टेस्टिंग कीट घेतलेल्या अशा ग्राहकांकडून किमान त्यांचे फोन क्रमांक घ्यावेत. त्यानंतर प्रशासन या क्रमांकांवरुन त्यांची विचारपूस करेल, असंही पवार म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top