Pune Fire News: वेल्डिंगच्या ठिणग्यांनी घेतला रौद्ररूप; मांजरीत दोन दुकाने आगीत खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

Two shops destroyed in Manjari fire incident: वेल्डिंगदरम्यान उडालेल्या ठिणग्यांमुळे गादी कारखाना व हार्डवेअरला भीषण आग; दोन्ही दुकानांतील साहित्य जळून खाक, जीवितहानी टळली.
Two Shops Destroyed in Manjari Fire Sparked by Welding; No Casualties Reported

Two Shops Destroyed in Manjari Fire Sparked by Welding; No Casualties Reported

esakal

Updated on

-कृष्णकांत कोबल

मांजरी: वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांतून लागलेल्या आगीत मांजरी रस्त्यावरील रंगीचा ओढा परिसरात दोन दुकाने जळून भस्मसात झाली. आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन अग्निशामक वाहने व एक पाण्याच्या टँकरच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दुकानातील साहित्य जळून खाक झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com