कोण काय म्हणाले?

कोण काय म्हणाले?
Published on

पश्‍चिम बंगालमध्ये आता शासकाचे नव्हे, तर कायद्याचे राज्य असेल. पोलिसांवर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांच्या संरक्षणासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबविले आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सुवेंदू अधिकारी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

‘नीट’चा विषय संवेदनशील आहे. आता प्रकारण उघड झाल्याने कोणावर तरी जबाबदारी न टाकता केंद्र सरकारने याची गंभीर दखल व जबाबदारीही घ्यायला हवी. लाखो मुलांचे व कुटुंबांचे स्वप्न उद्‍धवस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यायाला हवा.
- रोहित पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एकाचबरोबर केंद सरकार व राज्यात द्रमुक व अण्णाद्रमुकसारख्या पक्षांविरुद्ध लढून मोठे यश मिळविले आहे. यामुळे मला त्यांचा हेवा वाटत नाही, तर कौतुक व आश्‍चर्य वाटते. लोकांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील याचा विश्‍वास आहे.
- रजनिकांत, अभिनेता

ओबीसींनो आतातरी जागे व्हा! राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. हा निर्णय म्हणजे आरक्षणविरोधी मानसिकतेचे जिलंत उदाहरण आहे.
- विजय वडेट्टीवार, काँग्रेस आमदार

पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून यामागे सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आहे. पेपरफुटी करणाऱ्या माफियांना राजकीय संरक्षण मिळत आहे. इतके गंभीर प्रकार घडत असतानाही केंद्र सरकार यातून योग्य धडा घेत नाही.
- कन्हैया कुमार, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com