महापुरातूनही सावरला गाळप हंगाम; साखर उताऱ्यात किंचित घट

महापुरातूनही सावरला गाळप हंगाम; साखर उताऱ्यात किंचित घट

पुणे - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महापुरामुळे हाहाकार माजविला होता. त्यामुळे गाळप हंगामात साखरेच्या उताऱ्यात मोठी घट होईल, अशी शक्यता होती. परंतु साखरेच्या उताऱ्यात किंचित घट झाली असून, यंदा साखरेचा सरासरी उतारा ११.२५ टक्के आहे. मागील हंगामात हे प्रमाण ११.२६ टक्के होते. 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुरात ऊसाचे पीक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ऊसपिकाचे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम लगेचच नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या गाळप हंगामावर होऊन साखरेच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत होता. परंतु, यावर्षी कोल्हापूर विभागात साखरेच्या उताऱ्यात किंचित घट झाली असून, सरासरी उतारा १२.२८ टक्के आहे. गेल्या हंगामात हे प्रमाण सरासरी १२.३९ टक्के होते. 

राज्यात यंदाच्या २०१९-२० च्या हंगामात १४६ साखर कारखान्यांनी ५४१लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यावर्षी कारखान्यांनी ६१० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात २०१८-१९ मध्ये १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या कारखान्यांनी ९५२.११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ हजार ७२ लाख क्विंटल साखर उत्पादित केली होती. तसेच, २०१७-१८ या वर्षात १८८ कारखान्यांनी ९५२. ६० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १हजार ७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साखरेचे उत्पादन वाढ 

मागील दोन हंगामात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ झाली. परंतु उसाचे क्षेत्र घटल्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात सुमारे चारशे लाख क्विंटलनी घटले आहे. परंतु यावर्षी उसाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली असून, पुढील हंगामात साखरेच्या उत्पादनात वाढ होईल, असा असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

साखरेच्या उताऱ्याचे प्रमाण : (गाळप हंगाम, टक्केवारी) 

२०१९ -२० ११.२५ 
२०१८ -१९ ११.२६ 
२०१७-१८ ११.२४ 
२०१६-१७ ११.२६ 
२०१५-१६ ११.३३ 

विभागनिहाय साखर उतारा (२०१९ -२०) टक्क्यात 
कोल्हापूर : १२.२८ 
पुणे : ११.३४ 
सोलापूर : ९.९३ 
नगर : १०. ४२ 
औरंगाबाद : १०.०४ 
नांदेड : ११.३४ 
अमरावती : १०.१४ 
नागपूर : ९.७८ 

अतिवृष्टीचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर होईल, असा अंदाज होता. परंतु साखरेच्या उताऱ्यामध्ये घट झाली नाही. वर्षी ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 
- अर्चना शिंदे, साखर सहसंचालक (विकास) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com