Video : #Responsiblenetism : सायबर सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी?

गायत्री तांदळे
Saturday, 8 February 2020

ऑनलाइन गेम्सबद्दल घ्यावयाची काळजी

 • मूल कोणते गेम्स खेळतात, याकडे लक्ष द्यावे
 • मूल खेळत असलेल्या गेम्सची esrbo.org या वेबसाइटवरून माहिती घ्यावी
 • सायबर गुन्हे आणि सुरक्षिततेबाबत माहिती घ्या आणि मुलांनाही सांगा
 • गेम खेळताना मुलांना वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्याचे रूपांतर व्यसनात होते, अशा वेळी समुपदेशकांची मदत घ्यावी
 • क्वेस्ट गेम, स्ट्रॅटेजी गेम, क्रीडाप्रकारांवर आधारित ऑनलाइन खेळ खेळण्यास पसंती द्यावी.

पुणे - पुण्यासह राज्यभरातून चाइल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळे मुलांच्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुलांमध्ये सायबर सुरक्षेबद्दल जागृतीसाठी रिस्पॉन्सिबल नेटिझमअंतर्गत सायबर ॲलर्ट स्कूलच्या माध्यमातून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. यात ६५ टक्के मुले सायबर धोक्यापासून अनभिज्ञ आहेत, तर ८१ टक्के मुलांना सायबर सुरक्षेबद्दल ज्ञान नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘एचडीएफसी परिवर्तन’च्या सर्वेक्षणात सहावी ते दहावीचे २०,००० हून अधिक विद्यार्थी, ५००० पालक आणि ६५० शिक्षक सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांचे सायबर सुरक्षेबाबतचे ज्ञान किती आहे, हे जाणून घेण्यासाठी टेस्ट घेण्यात आली. 

‘या’ बदलांवर लक्ष ठेवा

 • संवाद न साधणे.
 • एकलकोंडेपणा, सतत उदास असणे.
 • स्वतःला इजा पोचवणे.
 • जेवण आणि झोपेच्या स्वरूपात झालेले अनियमित बदल.
 • चिडचिड करणे.

७० टक्के - मुले त्यांच्या वयासाठी कायदेशीर नाहीत असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात.
६५ टक्के - मुलांना सायबरविश्वातील धोक्‍यांबद्दल अजिबात माहिती नाही.
८१ टक्के  - मुलांना सायबर सुरक्षिततेबद्दल ज्ञान नाही.
५३ टक्के  - मुलांना माहीत नाही, की १३ वर्षांखालील मुलांनी सोशल मीडिया अकाउंट उघडू नये.

पोर्न कंटेंट व मुले
इंटरनेटवरील अश्‍लील कंटेंटबद्दल मुलांना लहान वयातच माहिती मिळते. कुतूहलापोटी मुले व्हिडिओ बघतात अन्‌ बऱ्याचदा त्याचे व्यसन लागते. याचा परिणाम आरोग्य व वर्तणुकीवर होतो. 

ऑनलाइन गेम्सबद्दल घ्यावयाची काळजी

 • मूल कोणते गेम्स खेळतात, याकडे लक्ष द्यावे
 • मूल खेळत असलेल्या गेम्सची esrbo.org या वेबसाइटवरून माहिती घ्यावी
 • सायबर गुन्हे आणि सुरक्षिततेबाबत माहिती घ्या आणि मुलांनाही सांगा
 • गेम खेळताना मुलांना वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे बऱ्याचदा त्याचे रूपांतर व्यसनात होते, अशा वेळी समुपदेशकांची मदत घ्यावी
 • क्वेस्ट गेम, स्ट्रॅटेजी गेम, क्रीडाप्रकारांवर आधारित ऑनलाइन खेळ खेळण्यास पसंती द्यावी.

योग्य स्क्रीन टाइम
वय वर्षे         स्क्रीन टाइम
२ ते ६           दररोज २० मिनिटे
७ ते १२         दिवसातून ३ वेळा २०-२० मिनिटे
१३ ते १६       दिवसातून २ तास  

डिजिटल गार्डियनसाठी काय कराल

 • इंटरनेटच्या वापराचे फायदे, तोटे आणि धोके स्वतः शिका
 • सायबर गुन्हे व सायबर सुरक्षिततेबाबत माहिती स्वतः शिका आणि आपल्या मुलांना शिकवा.
 • जेवताना संगणक व मोबाईलचा वापर होणार नाही, हे कटाक्षाने टाळा
 • मुलांच्या खोलीत संगणक न ठेवता बैठकीच्या खोलीत ठेवावा; जेणेकरून 
 • मुलांच्या संगणकावरील हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
 • मूल मोबाईल हाताळताना पालकांनी लक्ष द्यावे. अनेकदा ते मोबाईलवर नेमके काय पाहतात, हेच कळत नाही. त्यामुळे पालकांनी डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. 
  - डॉ. स्मिता जोशी, समुपदेशक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What to Care About Cyber Security