बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे यांनी काय मागण्या केल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

महापालिकेत समावेश झालेल्या नव्या गावांमधील रहिवाशांना पाणी, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी विश्रामगृह, मस्तानी तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास, संत सोपानकाका समाधीच्या विकासासाठी निधी आदी मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी राज्य सरकारकडे केल्या. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली.

पुणे - महापालिकेत समावेश झालेल्या नव्या गावांमधील रहिवाशांना पाणी, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी विश्रामगृह, मस्तानी तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास, संत सोपानकाका समाधीच्या विकासासाठी निधी आदी मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी राज्य सरकारकडे केल्या. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्‍नांबाबत सुळे या बैठका घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी महापालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावांतील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी त्यांनी केली. खडकवासला धरणालगतच्या मोकळ्या जागेत उद्यान करावे, भोरमधील प्रशासकीय इमारतीसाठी निधी द्यावा, असेही सुळे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did demand Supriya Sule ask for Baramati constituency