Kasba ByElection: कसबा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो? मागच्या 60 वर्षांमध्ये असा होता मतदारांचा मूड

Mukta Tilak
Mukta Tilakesakal

पुणेः कसबा पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेली निवडणूक आहे. ही निवडणूक होणार की बिनविरोध निवड होणार, अशी चर्चा असतांना अखेर निवडणूक पार पडत आहे. महाविकास आघाडीनेही उमेदवार देत निवडणुकीचं रणशिंग फुंकले.

आधी कसब्याची जागा कोण लढणार यावरुन गोंधळ सुरु होता. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना ‘कसब्या’तून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा असतानाच शैलेश टिळक यांनाच भाजपा नेत्तृवाने उमेदवारी नाकारली. त्याठिकाणी नवीन चेहरा म्हणजेच हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. रासनेंना उमेदवारी दिल्यामुळे शैलश टिळकांनी नाराजी व्यक्त केली होती.

कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. रविंद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपने टिळक कुटुंबाला डावलल्यामुळे पक्षाला फटका बसू नये म्हणून परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक परिवाराशी संवाद साधला.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे (Nana kate) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा बिनविरोध होईल, अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे.

मुक्ता टिळकांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक भाजपासाठी सर्वच अंगाने महत्वाची झालीय. ही निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपानेही जोरदार तयारी सुरु केलीय. कसब्यात तसा भाजपचं वर्चस्व राहिलंय. पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे 25 वर्षे प्रतिनिधित्व केलं. 1995 ते 2019 पर्यंत भाजप आमदार म्हणून कसबा मतदारसंघात बाजी मारली. विधानसभा निवडणूक 2019मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या . 1990 ते 2019 पर्यंत कसबा मतदारसंघात भाजपचा बोलबाला राहिलाय. पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला 'हार्ट ऑफ पुणे सिटी' असेही म्हणतात.

असा आहे राजकीय इतिहास

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांनी 7 लाख 5 हजार 492 मते मिळवत कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. 2014मध्ये कसबा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे रोहित टिळक यांचा पराभव केला होता. खरं तर 1962मध्ये अपक्ष उमेदवार काळुराम उदानसिंग परदेशी यांनी विजय मिळवला होता. या मतदारसंघात 1962 ते 2019 पर्यंत एकूण 12 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. कसबा मतदार संघाच्या इतिहासात १९६२ पासून ते आतापर्यंत मुक्ता टिळक (भाजप) या एकमेव महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.

भाजपाच्या विधानसभा निवडणूक इतिहासात कसबा कायम अव्वल राहिलाय. इतकचं नाही तर भाजपासाठी कसबा मतदारसंघ कायमचं प्रतिष्ठेचं राहिलंय. त्यामुळेच भाजपासाठी ही पोटनिवडणूक अतिशय महत्वाची आहे.

एकंदरीतच कसबा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर भाजपचं बळ दिसतं. पण उमेदवाराला झालेला विरोध, नाराजीनाट्य. त्यामुळे भाजप कसबाचा इतिहास अबाधित राखणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com