esakal | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्णयाकडे जिल्हाचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्णयाकडे जिल्हाचे लक्ष

sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व संचालक मंडळ यांच्यामध्ये मतभेद होण्यास सुरवात झाली असून जाचक यांना संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसण्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या काही संचालकांनी विरोध केला आहे. आगामी काळामध्ये छत्रपती कारखान्याची निवडणूक होणार असून निवडणूकीपूर्वी जाचक विरुद्ध राष्ट्रवादीचे संचालक असा वाद-विवाद सुरु असून श्री छत्रपती कारखान्याच्या कारभारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालून सुरु झालेला वाद मिटविणार का याकडे इंदापूर,बारामती तालुक्यासह जिल्हाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

२००३ मध्ये पृथ्वीराज जाचक व पवार कुंटूबाचे मतभेद झाल्याने जाचक यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसची फारकत घेतली.जाचक यांनी थेट पवार साहेबांच्या विरोधामध्ये २००४ ची लोकसभेची निवडणणूक लढवली होती. तब्बल १७ वर्षानंतर बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या प्रयत्नामुळे जाचक व पवार कुंटूबाचे मनोमिलन झाले . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जाचक यांनी झाले गेले विसरुन जावून गेल्या दीड वर्षापासून श्री छत्रपती कारखान्याच्या कारभारामध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली. गेल्या गळीत हंगामामध्ये जाचक हे दररोज नियमित कारखान्याच्या उत्पादन विभागामध्ये बसून राहिले. तसेच संचालक मंडळाच्या बैठकीलाही हजेरी लावत होते. जाचकांची उपस्थिती काही संचालकांनी सुरवातीपासून खटकत होती.

हेही वाचा: ठेवी परत मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये साखरेची गुणवत्ता व रिकव्हरी वाढली. याचे श्रेय कोणाला द्यायाचे हा प्रश्‍न वेगळा आहे. मात्र यामुळे उस उत्पादक सभासदांचा फायदा झाला. शुक्रवारी (ता.८) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जाचक यांना बाहेर जाण्यास अचानक सांगण्यात आल्यावरुन जाचक विरुद्ध संचालक मंडळ असा वाद वाढला. भविष्यात हा वाद विकोपाला जाणार आहे. येत्या काही महिन्यामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार असून याचे पडसाद निवडणूकीमध्ये दिसणार आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाबाहेर कधीच जावू शकणार नाही.

अजित पवार यांचा शब्द अंतीम असतो. जाचक व संचालक मंडळामध्ये सुरु झालेल्या वादामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालून हा वाद मिटविणार का 0 याकडे नीरा खोऱ्याचे लक्ष लागले आहे. हा वाद न मिटल्यास श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक शेतकरी कृती समिती विरुद्ध राष्ट्रवादी कॉग्रेस अशी चुरशीची होईल.सध्या साेमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडूणूकीची रणधुमाळी सुरु आहे. तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती अजित पवार यांच्या गटाची एकहाती सत्ता असून अजित पवार यांच्या निर्णयाकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top