Vasant More: वसंत मोरेंचं काय होणार? अजित पवारांच्या ऑफरनंतर मनसे दोन दिवसांत घेणार भूमिका

पुणे शहरातील मनसे पक्ष कार्यालयात बैठक झाल्यानंतर पक्षाकडून ही माहिती देण्यात आली
MNS Pune
MNS PuneEsakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर येतात. तर काही दिवसांपूर्वी मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतरही मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर वसंत मोरे मनसे सोडणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्याचे दिसुन आले आहेत.

त्यानंतर आता वसंत मोरे यांच्याबद्दल पक्ष येत्या दोन दिवसात भूमिका घेणार आहे. मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे शहरातील मनसे पक्ष कार्यालयात बैठक झाल्यानंतर पक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्याबाबत आज चर्चा झाली नसली तरी सुद्धा, त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे येत्या दोन दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करेल असं वागस्कर यांनी सांगितले आहे. पक्ष वसंत मोरे यांच्याबाबत काय भूमिका घेणार, त्यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

तर, अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठीची ऑफर दिली आहे. अजित पवार तात्या कधी येता... वाट पाहतोय, असं म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यामुळे मनसेमध्ये खळबळ वाढु शकते. वसंच मोरे पुण्यातील मनसेचा चेहरा आहेत. त्यामुळे वसंत मोरे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.

MNS Pune
Ajit Pawar: 'तात्या कधी येताय...वाट पाहतोय', नाराज वसंत मोरेंना अजित पवारांकडून ऑफर

तर यासंदर्भात बोलताना मनसे सोडणार नसल्याचे देखील वसंत मोरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी घेतलेली भुमिका वसंत मोरे यांना रुचली नाही. त्यानंतर मोरे यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं मत बोलून दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चांना उधाण आलं होतं.

MNS Pune
MNS Pune: मनसेला खिंडार! एकाच वेळी 400 कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही ठोकणार पक्षाला रामराम?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com