Pune : जेव्हा दस्तुरखुद्द राज ठाकरेंकडूनच होते बाळाचे बारसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेव्हा दस्तुरखुद्द राज ठाकरेंकडूनच होते बाळाचे बारसे
जेव्हा दस्तुरखुद्द राज ठाकरेंकडूनच होते बाळाचे बारसे

जेव्हा दस्तुरखुद्द राज ठाकरेंकडूनच होते बाळाचे बारसे

पुणे : आत्तपर्यंत ज्या पक्षासाठी आयुष्य वेचले, त्याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thakrey) यांनीच आपल्या बाळाचे बारसे करावे, हि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा होती. त्यासाठीच गुरुवारी सकाळपासूनच हे दाम्पत्या 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन ठाकरे यांची केसरीवाड्यात(kesri wada) वाट पाहात होते. ठाकरे बैठक संपवून निघाले, तेवढ्यात हे दाम्पत्य त्यांच्यासमोर गेले, त्यांनी आपली इच्छा बोलून दाखविली. ठाकरेंनी "इतकी मोठी जबाबदारी नको,' म्हणत नकार देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी कार्यकर्त्यापुढे त्यांचेही काही चालले नाही. अखेर दस्तुरखुद्द राज ठाकरे (raj thakrey) यांनीच बाळाचे नामकरण केले, बाळाला नाव दिले "यश' !

निशांत कमळू. परभणीच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव. मागील काही वर्षांपासून पुण्यातील आंबेगाव परिसरात राहतात. एक-दोन वर्षांपुर्वी त्यांचा विशाखा यांच्याशी विवाह झाला. चार महिन्यांपुर्वीच त्यांच्या घरी एक गोंडस बाळ आले. आपल्या या बाळाचे नाव राज ठाकरे यांच्याकडूनच ठेवायचे, असे निशांत व विशाखा यांनी ठरविले. मात्र चार महिन्यांच्या बाळाला घेऊन मुंबईला जाणे शक्‍य नव्हते. त्यामुळे हे दाम्पत्य ठाकरे यांची पुण्यात(pune) येण्याची वाट पाहत होते. राज ठाकरे यांचा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली. दुसऱ्या दिवशी केसरीवाडा(kesri wada) येथे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती.

हेही वाचा: कोल्हापूरमध्ये उत्‍पन्‍नवाढीचा विचित्र`नमुना`

त्यास ठाकरे येणार होते. हि बातमी निशांत यांना कळली. त्यानुसार, हे दाम्पत्य आपल्या बाळाला घेऊन सकाळी नऊ वाजल्यापासून ठाकरे यांची वाट पाहत थांबले होते. ठाकरे आले, त्यांची बैठक सुरू झाली. त्यानंतर काही वेळाने बैठक संपवून ते पुढच्या बैठकीसाठी निघाले. तेवढ्यात निशांत व विशाखा यांनी ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी आपली इच्छा ठाकरेंसमोर व्यक्त केली. त्यांनीही दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्याची इच्छेला नकार देणे त्यांना जमले नाही. अखेर राज ठाकरे यांनीच बाळाला आशिर्वाद देत "यश' नाव दिले.

हेही वाचा: कोल्हापूर - गव्याचा शहरात फेरफटका; वडणगेच्या दिशेने रवाना

खुद्द राज ठाकरे यांनीच आपल्या बाळाला नाव दिल्यामुळे दाम्पत्याचा आनंद द्विगुणीत झाला. ""मी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत, ठाकरे साहेबांसोबत काम केले आहे. यापुढेही करणार आहे. माझ्या बाळाला देशसेवेसाठी तयार करणार आहे. त्यामुळेच त्याचे नाव राज ठाकरे यांनीच ठेवावे, अशी इच्छा होती. त्यांनी ती पुर्ण केल्यामुळे आम्ही खुप खुष आहोत.'' असे निशांत कमळू यांनी सांगितले.

टॅग्स :Pune NewsRaj Thackeray