आम्हाला कोणी वाली आहे का ? पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

गेल्या ५४ दिवसांपासून पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी एकट्याने खोलीत रहात आहेत. त्यांना गावाकडे जायची परवानगी मिळावी, सरकारने बसची सुविधा करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या नोंदणी साठी खास गुगल फाॅम तयार केला, त्यामुळे आता काही तरी निर्णय होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर काहीच निर्णय झाला नाही.

पुणे : देशात चौथ्या टप्प्यातील लाॅकडाऊन जाहीर झाले, लाखो मजूर महाराष्ट्राबाहेर गेले, मात्र पुण्यातील विद्यार्थी त्यांच्या घराकडे जाऊ शकले नाहीत. या विद्यार्थ्यांना कोणी वाली आहे का? असा संतप्त सवाल करत ''आमची घरी जायची सोय करा'' अशी मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या ५४ दिवसांपासून पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी एकट्याने खोलीत रहात आहेत. त्यांना गावाकडे जायची परवानगी मिळावी, सरकारने बसची सुविधा करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या नोंदणी साठी खास गुगल फाॅम तयार केला, त्यामुळे आता काही तरी निर्णय होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर काहीच निर्णय झाला नाही. सरकार कोटातील विद्यार्थी, दिल्लीतील विद्यार्थी महाराष्ट्रात आणत आहे, पण पुण्यातील मुलांसाठी काहीच होत नाही यावर संताप व्यक्त केली. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, मनविसेे, भाजप, प्रहार या संघटना व पक्षांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत बस उपलब्ध करून दिली.  पण सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. या विद्यार्थ्यांसाठी रोज डबे पुरविले जात आहेत, सरकारने जेवणाची जबाबदारी घेतलेली नाही. पुण्यातील स्थिती गंभीर होत असताना विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतातुर आहेत. 

पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

एमपीएससी स्टुडंट्स राईट्स महेश बडे म्हणाले, पुण्यातील विद्यार्थ्यांना घरी जाता यावे यासाठी खुप प्रयत्न केले. पण केवळ आश्वासन मिळाले. हे विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत. म्हणून ते मोफत बसची याचना करत आहेत. पण आमच्यासाठी कोणी वालीच नाही हे स्पष्ट झाले आहे. 

पुणे शहराच्या किमान तापमानात झाली वाढ; पुढील सहा दिवस...

शिवकुमार बिरादार म्हणाला, "पुण्यातील स्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे आम्हाला घरी जाऊ दिले पाहिजे. गावाकडे गेल्यावर एक महिना क्वारंटाईन करा पण घरी जाऊ द्या. 

महिलेला दम लागत असल्याने नेले जात होते रुग्णालयात पण...

स्वखर्चाने बस रवाना
शनिवारी सायंकाळी गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर, जळगाव, यवतमाळ, जालना, जळगाव, सिंधुदुर्ग येथील एकूण १८१ विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यात पाठविण्यात आले. या विद्यार्थ्यांना परवानगी काढून देणे ,बस व्यवस्था करणे, आरोग्य तपासणी करून देण्यात आली.

धक्कादायक! पुण्यात 'या' ठिकाणी आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when we will go home asked angry students who stuck in Pune