
पुणेः पुणे शहराची तहान वाढत असताना त्या प्रमाणात पाणी कोटा मंजूर होत नाही. गेल्या अनेक वर्षापासून मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याची मागणी वारंवार होत असली तरीही ती अद्याप मंजूर झालेली नाही. पुणे शहराची वाढत जाणारी हद्द, लोकसंख्या याचा विचार करून हा पाणी कोटा मंजूर झाला पाहिजे यासाठी शहरातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा पाण्यासाठी ‘मुळशीचा सत्याग्रह’ पुणेकरांनाच सत्याग्रह करावा लागेल.