Pune : विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील वाहतुक कोंडी कधी सुटणार: ‘आप’चा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule Pune University

विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील वाहतुक कोंडी कधी सुटणार: ‘आप’चा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील वाहतूक कोंडीला प्रशासन जबाबदार आहे. आता त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी एकमेकांवर दोषारोप करत आहे. तात्पुरता पर्यायी वाहतूक नियोजनाचा आराखडा ही वर्षभरानंतर तयार नाही, आर्थिक नियोजन नाही, वेळापत्रक नाही ही स्मार्ट सिटीमधील उड्डाणपुलाची अवस्था आहे आणि त्याला स्थानिक सत्ताधारी भाजप व राज्य सरकारची जबाबदार आहे,’’ असा आरोप आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

मागील वर्षी याविषयी चर्चा चालू असताना नागरिकांना विश्वासात घेऊन उड्डाणपूल योजनेबाबत सूचना मागविण्यात याव्यात आणि तज्ञांच्या मदतीने प्रस्ताव तयार करावा, त्यानंतरच पूल पाडायला सुरवात करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली होती. परंतु पालकमंत्र्यांनी याआधीचा पूल पाडायची केलेली घाई आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था लगेच करून घेऊ असे आश्वासन देणारे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार हे आताच्या वाहतूक कोंडीला जबाबदार आहेत. आता आंदोलने करून जनतेला सहन करावी लागणारी वाहतूक कोंडी काही सुटणार नाही. या वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना आता किमान दोन वर्षे बसणार आहे. येत्या काळात निवडणूक असल्यामुळे ‘वाहतूक व्यवस्था सुधारू’ असे आश्वासन भाजप आणि महाविकास आघाडी देईल. पण प्रत्यक्ष प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत हे पुणेकरांचे दुदैव आहे, असे मत किर्दत यांनी मांडले.

loading image
go to top