esakal | Pune: वाघोलीत बीआरटी बस टर्मिनलला मुहूर्त लागणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

Wagholi BRT
वाघोलीत बीआरटी बस टर्मिनलला मुहूर्त लागणार का?

वाघोलीत बीआरटी बस टर्मिनलला मुहूर्त लागणार का?

sakal_logo
By
अक्षय साबळे

वाघोली : वाघोलीत बीआरटी बस टर्मिनलला मुहूर्त कधी लागणार याचे उत्तर महापालिका व पी एम पी एल देईल का असा सवाल प्रवासी व नागरिक करीत आहे. बी आर टी बस थांब्यासाठी केसनंद फाट्यावर जागा घेऊन अनेक वर्ष लोटली. मात्र अद्याप टर्मिनल उभारण्याचे नाव महापालिका घेत नाही.

बस थांब्यासाठी जागा ताब्यात घेतानाच येथे सुसज्ज टर्मिनल उभारले जाईल असे आश्वासन महापालिकेने दिले होते. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतुदही केली होती. टर्मिनल चा प्लॅन मंजुरीसाठी पी एम आर डी ए ला दिला असल्याचे अधिकारी सांगत होते. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झाली नाही. येथे सुसज टर्मिनल उभे राहिल्यास प्रवासी व कर्मचारी यांची सोय होईल. तसेच पी एम पी एल चे उत्त्पन्नही वाढेल. लवकरात लवकर येथे टर्मिनल उभारावे अशी प्रवाश्यांची मागणी आहे.

बस थांबा जागेतील समस्या

 1. गैरसोयी अभावी कर्मचारी व प्रवासी यांचे हाल.

 2. बी आर टी थांबा जागेत खड्डे, चिखल, कचरा, वाढलेले गवत, दगडांचा खच.

 3. कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची अद्याप सोय नाही.

 4. स्वच्छतागृहाचे बांधकाम अपूर्ण.

 5. फलकांचा अभाव

 6. प्रवाश्यांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही

 7. पुरेश्या विजेचा अभाव.

 8. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेश्या खोल्या नाहीत.

बी आर टी बस दृष्टी क्षेपात

 1. वाघोलीतून 12 मार्गावर धावतात पी एम पी एल बसेस.

 2. सुमारे 80 बसेसच्या दररोज फेऱ्या.

 3. सुमारे 25 ते 30 हजार रुपये किमतीच्या पासेसची दररोज वाघोली केंद्रातून विक्री.----

 4. भरघोस उत्पन्न मात्र टर्मिनल उभारण्याकडे दुर्लक्ष.

 5. अनेक मार्गावर बस फेऱ्यांना प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद.

loading image
go to top