अकरावीच्या प्रवेशाची प्रतीक्षा कधी संपणार? विद्यार्थ्यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पालकांची चिंता वाढली 

पुणे : शेतकरी कुटुंबातील अंकिताला (नाव बदललेले आहे) दहावीला 87 टक्के मिळाले. पुढील शिक्षण शहरातील नामांकित महाविद्यालयात घेण्यासाठी तिच्या पालकांसह शेजारीही प्रयत्न करत आहेत. अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत पसंतीच्या महाविद्यालयात नाव येईल अन शुल्क भरून प्रवेश निश्‍चित करता येईल, म्हणून तिच्या पालकांनी काही रक्कम बाजूलाही ठेवली होती. परंतु, आता प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने अंकितासह तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी नियमित गुणवत्ता यादी 10 सप्टेंबर रोजी जाहीर होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आदेशाच्या अनुषंगाने या प्रक्रियेची कार्यवाही पुढे ढकलली आहे. तसेच, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने अंकिता आणि तिच्या पालकांप्रमाणेच अन्य विद्यार्थी-पालक हवालदिल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धायरीत राहणारे संतोष साकोरे म्हणाले, ""प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीत 87 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थिनीच्या प्रवेशासाठी आम्ही शेजारी म्हणून प्रयत्न करत आहोत. आरक्षणाला आमचा निश्‍चितच विरोध नाही. परंतु, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून प्रवेशाबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीमुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल.'' 
दहावीला 82 टक्के मिळालेल्या अनिकेतचे वडील संतोष सरडे म्हणाले, ""दहावीची परीक्षा झाल्यापासून कोरोनामुळे विद्यार्थी घरात बसून आहेत. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता कुठे त्यांना दिलासा मिळाला. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे मुलांचा चिडचिडपणा काहीसा वाढला आहे. प्रवेश झाल्यानंतर लवकरच अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू होतील, अशी मुलांची अपेक्षा आहे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीसाठी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर प्रवेश मिळेल आणि टेन्शन जाईल, असे वाटले होते. परंतु, आता प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे "टेन्शन' आणखी वाढले आहे. अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा संपणार कधी, असा प्रश्न पडला आहे. 
- श्रावण सोनटक्के, 
अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the wait for the 11th admission end