अनपेक्षितच! जिथनं अपहरण केलं तिथंच सोडलं; आईच्या कुशीत बाळ पुन्हा विसावलं

From where baby kidnapped were left there again by kidnappers in Hadapsar
From where baby kidnapped were left there again by kidnappers in Hadapsar

पुणे : साखर झोपेत असलेल्या बाळाला पळवून नेल्याने मुलाच्या विरहात असलेल्या आईला दोन दिवसांतच सुखद धक्का बसला आहे. ज्या ठिकाणावरून बाळाचे अपहरण केले होते अपहरणकर्त्यांनी तिथेच आज पहाटेच्या सुमारास बाळाला आणून सोडले. त्यामुळे एक वर्षांचे हे बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले आहे.

कार्तिक नीलेश काळे (वय एक वर्ष) असे बाळाचे नाव आहे. हडपसर येथील पुलाखाली आईच्या कुशीत झोपलेल्या या बाळाचे सोमवारी (ता. 23) दोन महिलांनी अपहरण केले होते. बाळाची आई सकाळी उठल्यानंतर तिला हा प्रकार समजला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत महिलेने त्वरित पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या मोकळ्या जागेमध्ये शर्मिला आणि त्यांचा मुलगा कार्तिक नातेवाईकांसोबत राहत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास आईच्या बाजूला झोपलेले बाळ जागेवर नसल्याचे समोर आले. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात बाळाचा शोध घेतला. मात्र कार्तिक सापडला नाही. बाळाच्या आईने तक्रार दाखल केल्यावर त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास केला असता. त्यात दोन महिला बाळाला सोलापूर रोडच्या दिशेने घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यानुसार आम्ही तपास करण्यास सुरवात केली.

दरम्यान आज पहाटेच्या सुमारास ज्या ठिकाणावरून बाळाचे अपहरण झाले. त्याच ठिकाणी लाल कपड्यात बाळ सोडून दिले आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर त्याच्या आईने आजूबाजूला पाहिले. तेव्हा तिला बाळ दिसून आले. बाळ सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी या बाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाळाची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com