MP Supriya Sule
sakal
पुणे - 'अयोध्येतील राम मंदिराच्या दान पेटीतील पैशांची चोरी आणि जंतर मंतरवर झालेले तरुणांचे आंदोलन या दोन महत्त्वाच्या घटना देशात घडल्या. याच घटनांशी संबंधित चर्चेची मागणी आम्ही अधिवेशनात करत होतो. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्याचा आदेश कोणी दिला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरात चोरी कोणी केली आणि चोरीचा पैसा गेला कुठे ? याचे उत्तर आम्हाला सरकारने द्यावे.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला जाब विचारत दोन्ही प्रश्नांकडे लक्ष वेधले.