रस्ता क्राॅस करायचा तरी कसा?; वारजेकरांना पडलायं प्रश्न कारण....

warje.jpg
warje.jpg

वारजे (पुणे) : येथील एन. डी. ए. रस्त्यावरील जिजाई गार्डन जवळील रस्त्याला पादचारी पट्टा आहे. मात्र हा पट्टा असा मारला आहे की, पादचाऱ्याला एकदम दुभाजकावर चढून रस्ता पार करावा लागेल. मग याला पादचारी पट्टा म्हणायचा की पादचारी उड्डाणपट्टा म्हणायचा असा प्रश्न कवि राजेंद्र वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहने थांबवून याच पादचारी पट्ट्याचा वापर करून रस्ता पार करता यावा या उद्देशाने रस्त्याला असे पादचारी पांढरे पट्टे ( झेब्रा क्रॉसिंग ) तयार केले जातात. यावरून ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडताना दिसतात. मात्र, वारज्यातील एन. डी. ए. रस्त्याला तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पादचारी पट्टा आहे. 

मात्र, हा पट्टा ओलांडत असताना मध्ये दुभाजक असल्याने रस्ता ओलांडणे अशक्य आहे. हा पादचारी पट्टा असा मारला आहे की,  त्या पादचाऱ्याला रस्त्याच्या दुभाजकावरच चढण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा वाहनाने टक्कर दिलीच म्हणून समजावी. अशा चुकीच्या पद्धतीने हा पादचारी पट्टा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक रस्ता ओलांडत असताना नागरिक बुचकळ्यात पडत आहे. 
  

 

आम्ही असे पट्टे मारायचे असेल तर महापालिकेला पत्र देतो. महापालिका संबंधित ठेकेदाराला काम करावयास सांगते. या ठेकेदाराने चुकीच्या पदतीने पादचारी पट्टा तयार केला आहे. त्यांनी ती चूक दुरुस्त करावी. 
 - किरण लोंढे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वारजे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com