esakal | वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad member Katke's demand to PMRDA for Fund development work in Wagholi

वाघोलीत मोठ्या प्रामाणात गृहप्रकल्प झाल्याने नागरीवस्ती वाढली आहे. बहुतांशी बांधकामांवर अनधिकृतचा शिक्का असला तरी अशा बांधकामांचा कोणताही धोका नाही त्यामुळे सदर कामे अल्प दंड आकारून अधिकृत करणे गरजेचे आहे.

वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वाघोली(पुणे) : वाघोली येथील काही महत्वाचे प्रकल्प लॉकडाऊनमुळे निधी उपलब्ध न झाल्याने रखडले आहेत. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सदर प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे असून तातडीने निधी उपलकध करून द्यावा व येथील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी  निर्णय घ्यावा. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कटके व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पीएमआरडीए आयुक्तांची यांची भेट घेऊन कामे तसेच निधीबाबत चर्चा केली. कटके म्हणाले की, वाघोलीत मोठ्या प्रामाणात गृहप्रकल्प झाल्याने नागरीवस्ती वाढली आहे. बहुतांशी बांधकामांवर अनधिकृतचा शिक्का असला तरी अशा बांधकामांचा कोणताही धोका नाही त्यामुळे सदर कामे अल्प दंड आकारून अधिकृत करणे गरजेचे आहे.

वाघोलीत प्रामुख्याने सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाची समस्या मोठी आहे. ग्रामपंचायतीने ग्रामनिधीद्वारे गावात बहुतांश भागामध्ये बंदिस्त ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केलेले आहे. त्यानुसार गावामध्ये सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प करण्याचेही प्रस्तावित असू याद्धारे शुद्ध होणारे पाणी भैरवनाथ तलावात सोडण्याचे नियोजन आहे. तलावा लगतच्या उद्यानालाही या पाण्याचा उपयोग होऊ शकेल तर उर्वरित पाणी शेतीसाठी सोडण्याचे प्रयत्न आहेत. या प्रकल्पासाठी ४ कोटीचे अंदाजपत्रक आलेले आहे. परंतु, ग्रामपंचायतीची सध्याची आर्थिक क्षमता पाहता सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नसल्याने पीएमआरडीएने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच, वाघोली कचरा प्रकल्प संदर्भातील प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याकरिता साधारण चार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

परिसरातील वाहतूक समस्या मुक्तीसाठी डीपी रस्ते संदर्भात बोर्ड मीटिंगच्या मंजुरीनंतर लवकरच सुचवलेले डीपी रस्त्याचे कामही चालू करण्याबाबतच्या सूचना करण्याची बाब यावेळी जि. प. सदस्य कटके यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. शक्य तितक्या लवकर निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त सुहास दिवसे यांनी शिष्टमंडळाला दिले.

loading image