Railway App Glitch : अँपवरच्या चुकीच्या माहितीनं १२५ प्रवाशांची फसगत; ‘व्हेअर इज माय ट्रेन’ मुळे वेळेवरची गाडी चुकली!

Where Is My Train Error : 'व्हेअर इज माय ट्रेन’ अॅपने चुकीची माहिती दाखवल्याने केडगावातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गाडी उशीर दाखवतानाही ती वेळेवर आल्यानं १२५ प्रवाशांची ट्रेन चुकली.
Overdependence on Mobile Apps Leads to Passenger Trouble

Overdependence on Mobile Apps Leads to Passenger Trouble

sakal
Updated on

केडगाव : सध्या रेल्वेशी संबंधित लोकप्रिय 'व्हेअर इज माय ट्रेन' या अॅपवर अनेकजण अवलंबून आहेत. अॅप बहुतांश वेळा रेल्वेची वेळ बरोबर दाखवते मात्र कधीतरी अॅप चुकू शकते. याचा अनुभव केडगावातून ( ता.दौंड ) प्रवास करणा-या प्रवशांनी आज घेतला. अॅपने गाडी उशीरा असल्याचे दाखविले परंतू गाडी नियमित वेळेत स्टेशनवर आली. अॅपवर विश्वास ठेवणा-या सुमारे १२५ प्रवाशांची गाडी आज चुकली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com