Lok Sabha Election: मतदान केंद्रावर नाव सापडत नाही ; बोगस मतदानाची शंका आहे? नेमकं काय करावं ? इथे करा तक्रार

Suspicions of bogus voting? Know where to complaint: देशभरात निवडणुका जोरदार सुरू आहेत. अनेक मतदार या वर्षी पहिलांदा मतदान करणार आहेत. या दरम्यान काही मतदारांना मतदानासाठी गेल्यानंतर आपले नाव न सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
where to complaint if name is absent on voters list bogus voting check
where to complaint if name is absent on voters list bogus voting checkEsakal

देशभरात निवडणुका जोरदार सुरू आहेत. अनेक मतदार या वर्षी पहिलांदा मतदान करणार आहेत. या दरम्यान काही मतदारांना मतदानासाठी गेल्यानंतर आपले नाव न सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काहींना त्यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे दिसून आले आहे. तुम्ही देखील पहिल्यांदा मतदान करत असाल तर किंवा तुम्ही याआधी मतदान केलं असेल पण तुम्हाला मतदार यादीत तुमचं नाव सापडतं नसेल तर काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? चला तर जाणून घेऊया काय आहे प्रक्रिया...

मतदार यादीत नाव कसं शोधाल?

तुम्ही याआधी नतदान दिलं असेल तरी देखील तुमचं नाव मतदार यागीत आहे की, नाही हे शोधणं गरजेचं आहे. कारण दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अद्ययावत केल्या जातात.

मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं. त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावं.

केंद्रीय निवडणूक आयोग मतदारांची यादी Voters service portal या मतदार यादीमध्ये देत असतं. या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा.

या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करून पाहा.

where to complaint if name is absent on voters list bogus voting check
Lok Sabha election 2024 : फर्स्ट टाइम वोटरला आला बोगस मतदानाचा अनुभव; संताप व्यक्त करत म्हणाली, 'उत्साहाने...'

मतदार यादीतील नाव कसे तपासायचे?

स्टेप 1 - यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://nvsp.in/ वेबसाइटवर जावे लागेल.

स्टेप 2 - येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, त्यापैकी Electoral Role वर क्लिक करा.

स्टेप 3 - यानंतर एक नवीन वेबपेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा मतदार आयडी तपशील प्रविष्ट करावा लागेल.

where to complaint if name is absent on voters list bogus voting check
Loksabha election 2024 : पुण्यात काही ठिकाणी बोगस मतदान तर अनेकांची नावं मतदार याद्यांमधून गायब? 'या' दिग्गजांचा समावेश

स्टेप 4 - यामध्ये नाव, वय, जन्मतारीख, लिंग, राज्य आणि जिल्हा इत्यादी तपशील समाविष्ट आहेत.

स्टेप 5 - यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.

स्टेप 6 - त्याच पेजवर तुम्हाला दुसरी लिंक मिळेल ज्यामध्ये EPIC नंबर, स्टेट आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

स्टेप 7 - यानंतर एक नवीन टॅब उघडेल आणि तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासू शकाल.

एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासा

स्टेप 1 - यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून टेक्स्ट मेसेज पाठवावा लागेल.

स्टेप 2 - EPIC लिहा आणि त्यासोबत मतदार ओळखपत्र क्रमांक टाका.

स्टेप 3 - नंतर हा संदेश 9211728082 किंवा 1950 वर पाठवा.चरण

स्टेप 4 - यानंतर, तुमच्या नंबरवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुमचा मतदान क्रमांक आणि नाव लिहिले जाईल.

स्टेप 5 - जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर तुम्हाला कोणतीही माहिती मिळणार नाही.

बोगस मतदानाशी संबधित तक्रार कशी कराल दाखल?

निवडणूक आयोगाने मतदानाशी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी स्टेट सेंट्रलाइज क्रमांक 18001801950 आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन क्रमांक 1950 जारी केला आहे.

किंवा

तुम्ही https://voters.eci.gov.in/home/ngsp या वेबसाईटवरती तुम्ही तुमची तक्रार दाखल करू शकते.

https://voters.eci.gov.in/home/ngsp या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही Register Complaint वरती क्लिक करा. तिथे तुमचा रजिस्टर फोन नंबर टाका. त्यानंतर पासवर्ड टाका. कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुमच्या फोनवर OTP जाईल. तो OTP टाकून तुम्ही log in व्हाल. त्यावरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com