लाच घेताना महावितरणचा कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या ताब्यात  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

ग्राहक दाखला देण्यासाठी अवघ्या 160 रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

पुणे : ग्राहक दाखला देण्यासाठी अवघ्या 160 रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

सचिन मुकुंद थोरात (वय 32) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी ग्राहक दाखला मिळावा, यासाठी महावितरणच्या उरुली कांचन उपविभागातील उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला होता. हा दाखला देण्यासाठी थोरात याने 160 रूपयांची मागणी केली. त्यानुसार, तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रर केली. त्यानुसार आज दुपारी थोरात यास त्यांच्याच कार्यालयात 160 रूपयांची लाच घेताना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक घनशाम बळप, पोलिस कर्मचारी दीपक तिलेकर, ढवणे, प्रशांत वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While taking a bribe the employee of MSEDCL was caught by the Anti Corruption Bureau